मुंबई : मुंबईतील अजित पवार यांचे निवासस्थान देवगिरी येथे कन्नडचे माजी आमदार आणि कन्नड साखर कारखान्याचे माजी चेअरमन नितीन पाटील यांनी अजित पवार यांची भेट घेतली. यावेळी राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेत नितीन पाटील यांनी पक्षात प्रवेश केला.
https://x.com/AjitPawarSpeaks/status/1817833263089733772
लोकशाहीवादी पक्षात मनापासून स्वागत आहे. राष्ट्रवादी पक्षाच्या संकल्पनेतील महाराष्ट्र, ज्यामध्ये चिरंतन प्रगती आणि स्थैर्य आहे, अशा राष्ट्रवादी विचारांना पाठिंबा देणाऱ्या सर्वांचे राष्ट्रवादीत स्वागत आहे, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी यावेळी दिली.