मुंबई : महाराष्ट्रात होत असलेल्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या सुरक्षेसह ११ कोटी रुपयांच्या थकबाकीच्या विषयावर आज राज्यातील ज्येष्ठ नेते शरद पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि एमसीएचे अध्यक्ष विजय पाटील यांच्यात बैठक पार पडली. या बैठकीला वळसे पाटील, पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्यासह मुंबई क्रिकेट असोसिएशनचे विजय पाटील, सी. एस. पाटील, जगदीश आचरेकर आदी उपस्थित होते.
दरम्यान, आयपीएलकडून जवळपास 11 कोटी रूपये थकबाकी मुंबई पोलिसांना देणे बाकी आहे. याबाबत या बैठकीमध्ये महत्त्वाची चर्चा झाली. याबाबत बोलताना विजय पाटील म्हणाले की, “आमची बैठक चांगली झाली. IPL चे सामने मोठ्या संख्येनं पहिल्यांदा महाराष्ट्राला मिळाले आहेत. आत्तापर्यंत आम्हाला पोलिसांचं चांगलं सहकार्य मिळालं आहे. आयपीएल संदर्भातील सर्व प्रश्न, अडचणी आम्ही शरद पवार यांच्यासमोर मांडल्या आहेत. आमच्या या काही मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय होईल अशी आम्हाला खात्री आहे.