🛑 अतिवृष्टीमुळे पुणे पिंपरी चिंचवड शहर व जिल्ह्यातील सर्व शाळांना 26 जुलै रोजी सुट्टी!
पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात अतिमुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील मुळशी, मावळ, खेड, वल्हे व भोर या तालुक्यामध्ये खडकवासला, पवना या धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. नदी-नाल्यांना पूर आल्यामुळे जिल्ह्यातील सर्व शाळांना उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सुट्टी जाहीर केली आहे. सर्व पालकांनी नोंद घ्यावी. स्वत:ची आणि आपल्या कुटुंबियांची काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.
मागील दोन दिवसापासून पडणार आहे मुसळधार पावसामुळे पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्याचबरोबर दोन्हीही शहराच्या पश्चिम भागात असणारे भोर, राजगड, मुळशी, मावळ या तालुक्यात पावसाने हाहाकार माजवला आहे. या भागात असणारी बहुतांश धरणे पूर्ण क्षमतेने भरत आलेली आहे. त्यामुळे धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यास प्रशासनाने सुरुवात केले आहे.

हवामान खात्याने पुढील काही तास अजूनही पावसाचा जर कायम राहील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील डोंगरमाथा परिसरात असणाऱ्या तालुक्यामधील शाळांना दिनांक 26 जुलै रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. याबाबतचे पत्र जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी प्रसिद्धी माध्यमांमध्ये दिले आहे.




