
पिंपरी, – पावसाने आज अतिवृष्टीचे रूप घेतले आहे. सतत पडणार्या पावसामुळे प्रभागतील काही ठिकाणी पाणी साचले आहे . या परिस्थितीची गंभीरपणे दखल घेत शत्रुघ्न काटे यांनी तातडीने पालिका अधिकार्यांसोबत पाणी साचलेल्या परिसरात पाहणी केली. पाहणी दरम्यान ज्या ठिकाणी पाणी साचले आहे अश्या ठिकाणी आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना दिले आहे .
पिंपळे सौदागर नाहीच तर संपूर्ण राज्यभरात अतिवृष्टीने जनजीवन विस्कळीत झाले आहे.पावसाची संततधार सुरू असल्याने प्रभागात काही ठिकाणी पुरस्थिती सारखी परिस्थिति निर्माण झाली आहे.अश्या वेळी परिसरातील नागरिकांनी महत्त्वाच्या कारणांशिवाय घराबाहेर पडणे टाळावे असे आवाहन नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी केले आहे .



