पिंपळे सौदागर : मागील 24 तासापासून अधिक काळ मावळ, मुळशीसह पिंपरी चिंचवड शहराला पावसाने झोडपले आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. मावळ तालुक्यात पवना खोऱ्यात सतत पडत असलेल्या मुसळधार पावसाने पवना नदी दुथडी भरून वाहत आहे. पवना नदीलगत असणारे रहाटणी भागातील गंगानगर येथे काही नागरिक अडकल्याची माहिती विरोधी पक्षनेते नाना काटे यांना मिळाली. यावेळी काटे यांनी पुढाकार घेऊन नागरिकांना सुखरूप बाहेर काढले.
पवना नदीचे पाणी अचानक मोठ्या प्रमाणात वाढल्याने चिंचवड मतदारसंघातील रहाटणी भागातील गंगानगर परिसरात नदीकाठच्या घरात मोठ्या प्रमाणात पाणी शिरले होते. यामध्ये जवळपास 20 ते 25 नागरिक अडकल्याची माहिती मिळताच नाना काटे यांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेत अग्निशामक विभागास संपर्क करून बोलवून घेतले. त्यांच्या मदतीने नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. अडकलेल्या पाण्यातून बाहेर येताच नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला.
नागरिकांनी खबरदारी घ्यावी
पुढील काही तास अजूनही पावसाचा जोर कायम राहण्याचे अंदाज हवामान खात्याकडून देण्यात आले आहेत. जिल्हा प्रशासनाने उद्याही शाळा बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे मावळ परिसरात होत असलेली पावसाची तीव्रता पाहता पवना नदीचे पाणी रात्री वाढू शकते. जिवापेक्षा काही महत्वाचे नसते त्यामुळे नदीचे पाणी वाढत असेल तर सुरक्षित स्थळी जावे किंवा पालिका प्रशासन तसेच नाना काटे जनसंपर्क कार्यालयास संपर्क साधावा असे वाहन माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी केले आहे.
नाना काटे जनसंपर्क कार्यालय मोबाईल
9067011112
9860001112
9923168264




