नवी दिल्ली : बीसीसीआयने माजी क्रिकेटपटू आणि माजी अधिकाऱ्यांबाबत मोठा निर्णय घेतला आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी माजी खेळाडूंच्या पेन्शनमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची घोषणा केली आहे.
यामध्ये पुरुष आणि महिला क्रिकेटशी संबंधित 900 जणांचा समावेश करण्यात आला आहे. या माजी खेळाडूंना लवकरच या पेन्शनचा लाभ मिळू लागेल.
बीसीसीआय जय शाह यांनी ट्वीट केले की, “माजी क्रिकेटपटू (पुरुष आणि महिला) आणि सामना अधिकाऱ्यांच्या मासिक पेन्शनमध्ये वाढ झाल्याची घोषणा करताना मला आनंद होत आहे. सुमारे 900 लोकांना याचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे 75 टक्के कर्मचाऱ्यांना 100 टक्के वाढीचा लाभ घेता येणार आहे.