मुंबई : पुणे शहरासह आजूबाजूच्या तालुक्यातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी प्रस्तावित असलेल्या पुणे रिंग रोडचे काम आता फास्ट ट्रॅकवर होणार आहे. १३६ किलोमीटर लांबीच्या या महत्वकांक्षी रस्त्यासाठी एमएसआरडीसीला तब्बल १६५३ हेक्टर जमीनीची आवश्यकता आहे. त्यापैकी ११९० हेक्टर म्हणजे जवळपास ७२ टक्के भूसंपादन पूर्ण झाले आहे. त्यामुळे या मार्गाच्या भूमिपूजनाचा नारळ लवकरच फुटणार असल्याचे निश्चित झाले आहे.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) जवळपास साडे दहा हजार कोटी रूपये खर्च करून पुणे रिंग रोड उभारत आहे. मात्र पुणे आणि आजूबाजूच्या तालुक्यांमध्ये जागांचे भाव गगणाला भिडलेले असल्याने रिगंरोडसाठी आवश्यक असलेली १६५३ हेक्टर म्हणजे ४ हजार एकरहून अधिक जमीन मिळणार का असा प्रश्न एमएसआरडीसीसमोर होता. त्यातच खासगी जमीनीबरोबरच वन जमीन कशी मिळवायची असा प्रश्न होता. मात्र एमएसआरडीसीला जमीन संपादनात मोठे यश मिळाले असून आतापर्यंत ९८४ हेक्टर खासगी, ६९ हेक्टर शासकीय तर १३७ हेक्टर वन जमीन अशा एकूण ११९० हेक्टर जमीनीचे संपादन केले असल्याची माहिती एमएसआरडीसीच्या एका वरिष्ठ अधिका-याने दिली. तसेच उर्वरित जमीन संपादन पुढील काळात होईल असेही त्यांनी सांगितले.
प्रकल्पासाठी अवाश्यक जमीन संपादित जमीन
खासगी १४४७ हेक्टर ९८४ हेक्टर
शासकीय ६९ हेक्टर ६९ हेक्टर
वन विभाग १३७ हेक्टर १३७ हेक्टर