
मुंबई : रिझर्व्ह बँकेन अल्पभूधारक शेतकऱ्यांना मोठा दिलासा देत शेतकऱ्यांसाठी तारणमुक्त कर्जाची मर्यादा १.६६ लाख रुपयांवरून २ लाख रुपये केली आहे. शेतीसंबंधित वाढते खर्च आणि एकंदर महागाईचा वाढता पारा लक्षात घेऊन, शुक्रवारी रिझर्व्ह बँकेने हा निर्णय घेतला.
यामुळे अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी कर्ज उपलब्धता वाढणार आहे. आघाडीच्या बँकांना तारणमुक्त कर्जाच्या योजनेसंबंधित सूचना लवकरच देण्यात येईल, असे मध्यवर्ती बँकेकडून सांगण्यात आले. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना कर्ज मिळवण्यासाठी तारण म्हणून मालमत्ता गहाण ठेवण्याची आवश्यकता नसते.
