
देहूगाव : श्री क्षेत्र देहु येथील वैकुंठधाममध्ये जगद्गुरू तुकाराम महाराज सदेह वैकुंठगमण निशतकोत्तर अमृत महोत्सव २०२५ निमित्त देहुकर सांप्रदायिक अखंड हरिनाम सप्ताह व ओळीची गाथा पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याची सुरुवात ७ मार्च २०२५ पासून होणार आहे आणि तो १४ मार्च रोजी सांगता होईल.
कीर्तनसेवा : ७ मार्च ते १३ मार्च होईल
- ह.भ.प. श्रीगुरू कान्होबा महाराज देहकर (पंढरपूर)
- ह.भ.प. श्री.प.पू. पांडुरंग महाराज घुले (अध्यक्ष, गाथा मंदिर देह)
- ह.भ.प. श्री. द्वारावार्य डॉ. रामकृष्णदास महाराज लहवितकर (नाशिक)
- ह.भ.प. श्री.प.पू. उमेश महाराज दशरथे (आळंदी)
- ह.भ.प. संतवीर बंडातात्या महाराज कराडकर
- ह.भ.प. चैतन्यमहाराज देगलुरकर
- ह.भ.प. चंद्रशेखर महाराज देगलूरकर
या सोहळ्याच्या अंतिम दिवशी म्हणजेच १४ मार्च रोजी, पौर्णिमा दिनी सकाळी ९ ते ११ वाजेपर्यंत श्रीगुरु प्रा. बाळासाहेब महाराज देहुकर (पंढरपुर) यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती स्वागतोत्सुक श्री. गंगाधर कारभारी जाधव (अध्यक्ष ह.भ.प.श्री. आचार्य रामकृष्ण महाराज लहवितकर ट्रस्ट) নালিক, विजय अण्णा गणपतराव जगताप (अध्यक्ष अखंड हरीनाम सप्ताह समिती) पिंपळेगुरव, पुणे आणि जगन्नाथ पांडुरंग काटे यांनी दिली आहे.
