देहूरोड (वार्ताहर ) देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील संकल्पनगरी जवळ सुरू असलेले दोन गाळयांचे अनधिकृत बांधकाम शुक्रवारी ( दि.१६ ) सकाळी पोलीस बंदोबस्तामध्ये पाडण्यात आले.
देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाची परवानगी न घेता पक्के आरसीसी बांधकाम सुरू होते.बांधकामाच्या तक्रारीनंतर बोर्ड प्रशासनाने शुक्रवारी सकाळी अकराच्या सुमारास एक जीसीबीच्या सुरू असलेले अनधिकृत बांधकाम पाडण्यात आले आहे. बोर्डाचे अभियंता, कर्मचारी आणि पोलीस पथकाच्या उपस्थितीत कारवाई करण्यात आली.



