पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिका कडून शहरात स्वच्छता मोहीम आयोजित केले आहे. स्वच्छता मोहिमेची प्रसिद्धीसाठी पिंपरी चिंचवड शहरातील आमदार लक्ष्मण जगताप, आमदार अण्णा बनसोडे, आमदार महेश लांडगे, विधान परिषदेच्या आमदार उमा खापरे, खासदार श्रीरंग बारणे यांच्या नावाने प्रसिद्धी बॅनर करून नागरिकांना आवाहन केले आहे. मात्र पिंपरी चिंचवड शहराला लाभलेले दुसरे शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांना पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासनाने डावल्याचे चित्र दिसत आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या ब क्षेत्रीय कार्यालयाच्यावतीने शनिवारी (दि. १७) चिंचवडगावात इंडियन स्वच्छ लीगचे आयोजन करण्यात आले होते. या मोहिमेत राजकीय पक्षांसह १४ स्वयंसेवी संस्थांनी सहभाग घेतला होता. इंडियन स्वच्छ लीगमध्ये जलदिंडी प्रतिष्ठाण, श्री मोरया इन्स्टीट्युट ऑफ पॅरामेडिकल हेल्थ सायन्स (चिंचवड), युनिक व्हिजन स्कूल (चिंचवड), डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज (पिंपरी), स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ ( प्राधिकरण ), ज्येष्ठ नागरिक संघ (प्राधिकरण ), इंडो अॅथलेटीक सोसायटी (चिंचवड), भावसार व्हिजन, गुरूकुल आर्मी, रोटरी क्लब (वाल्हेकरवाडी), शेवंतीबन कॉलनी मित्र मंडळ, संस्कार प्रतिष्ठाण आदी सोसायटी नागरिक उपस्थित होते.
स्वच्छता मोहिमेत महापालिकेकडून ठराविक कंपन्यांची जाहीरात का केली…..
ओल्या कचऱ्यापासून दहा दिवसांत खत तयार करणाऱ्या एका कंपनीच्या मशिनची जाहीरातबाजी महापालिकेने स्वच्छता मोहिमेत केली. ही मशीन कशी काम करते याची सविस्तर माहिती महापालिकेच्या व्यासपीठावरून देण्यात आली. तसेच खत निर्मिती करणाऱ्या अन्य एका खासगी कंपनीच्या बॅगचीही माहिती यावेळी देण्यात आली. महापालिकेने ठराविक कंपनीची जाहीरातबाजी का केली, याची चर्चा राजकीय नेते आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांमध्ये सुरू होती. या कंपनीचे महापालिकेतील कोणत्या अधिकाऱ्यांशी आर्थिक हितसंबंध आहेत याचीही चर्चा पालिका वर्तुळात रंगली होती.




