पिंपळे गुरव : पिंपळे गुरव येथील सुदर्शन चौक ते शहिद भगतसिंह चौक या दरम्यान रस्ता अतिशय अरुंद आहे. या ठिकाणी स्मार्ट सिटी अंतर्गत बनवलेले फुटपाथ वरती अनेक लोक अस्ताव्यस्त गाड्या पार्किंग करीत आहेत. या रस्त्यावर दुतर्फा वाहतुक दिवसभर सुरु असते. त्यामुळे येथे वाहतुक खोळबंणे हा नित्याचा प्रकार झाला आहे.
या रस्त्यावर वाहतूक कोंडी होण्यासाठी अस्ताव्यस्त वाहन पार्किंग होत असल्याने वाहतुक जाम होण्यात भर होते. अनेक गाडीमालक बेजबाबदारपणे रस्त्यावर वाहने उभी करतात. तर काही वाहन विक्री करणारे व्यावसायिक फुटपाथ आपल्यासाठीच आणि वडिलोपार्जित प्रॉपर्टी आहे असे गृहीत धरून गाड्या पार्किंग करून आरक्षित ठेवतात.
त्यामुळे महापालिकेचे क्षेत्रीय अधिकारी,अतिक्रमण विभाग यांनी सांगूनही हे मिजासखोर त्यांना काडीची किंमत देत नाहीत. त्यामुळे उगाच वादविवाद नको म्हणून ह्या रस्त्याने जा ये करणारे वाहचालक व स्थानिक रहिवासी हे नाईलाजस्तव दुर्लक्ष करीत आहे. तरी या गंभीर समस्येकडे लक्ष दयावे व येथे कडक कारवाई करावी. अशी मागणी सहाय्यक आयुक्त स्मिता झगडे यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे चिंचवड विधानसभा उपाध्यक्ष प्रदीप गायकवाड यांनी केले आहे.



