नगर : दक्षिण अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांनी आज (दि. 25 जून) खासदारकीची शपथ घेतली. नव्या संसद भवनातील निलेश लंके यांचा आज पहिला दिवस होता. संसदेच्या पायरीवर नतमस्तक होत नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांनी संसदेत प्रवेश केला.
संसदेत सध्या 18 व्या लोकसभेसाठी निवडून आलेल्या सदस्यांचा अर्थात खासदारांचा शपथविधी सोहळा सुरू आहे. या दरम्यान निलेश लंके यांनी देखील खासदारकीची शपथ घेतली. परंतू आश्चर्याची बाब म्हणजे निलेश लंके यांनी थेट इंग्रजीतून आपल्या सदस्यत्वाची शपथ घेतली.
जिंकलस भावा ! @Nilesh_LankeMLA
Don’t underestimate the Power of Common man!
And yes, You can talk English, walk English.. English is a funny language ! pic.twitter.com/kae7Rqm6Fe— Dr.Amol Kolhe (@kolhe_amol) June 25, 2024
निलेश लंके यांनी सभागृहात पाऊल ठेवताच पहिल्याच दिवशी आपले विरोधक सुजय विखे पाटील यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. दक्षिण अहमदनगर लोकसभेची निवडणूक यंदा अतिशय चुरशीची झाली. येथे गेल्या अनेक दशकांची विखे-पाटील घराण्याची असलेली सत्ता निलेश लंके यांनी मोडून काढली. पहिल्यांदाच तुतारीच्या चिन्हावर निवडणूक लढवत निलेश लंके यांनी विखे पाटील यांचा दणदणीत पराभव केला.
लोकसभेच्या निवडणुकीत अनेक विषयांवरती चर्चा झाली. यामध्ये प्रामुख्याने डॉक्टर सुजय विखे यांनी शिक्षणाच्या मुद्द्यावरून आमदार निलेश लंके यांना टोचले होते. परंतु पहिल्यांदाच आमदार आणि पहिल्यांदाच खासदार झालेल्या निलेश लंके यांनी आज पहिल्या दिवशी संसदेत खासदार पदाची शपथ थेट इंग्रजीमध्ये घेऊन सर्वांनाच आवक केले.