पिंपरी : जसजसे नवनवीन तंत्रज्ञान येते तसतसे जुन्या गोष्टींची जागा नवीन उपकरणे घेतात. अशाच काही प्रकार सध्या इंटरनेट वाय-फाय केबल नेटवर्कने घेतला आहे. पूर्वी टीव्ही पाहण्यासाठी ठिकठिकाणी केबल नेटवर्क मोठ्या प्रमाणात चालत होते. त्यानंतर केबल व्यवसाय बंद होऊन प्रत्येक घरावरती डीटीएच डिश आला.
सध्याचे जग फास्ट इंटरनेट स्पीडचे आहे. कोविड महामारीनंतर खऱ्या अर्थाने वायफाय केबलचा व्यवसायात वाढ झाली. कोविड काळात मुलांना ऑनलाईन शिक्षण घेण्यासाठी बहुतांश शहरातील घरोघरी वायफाय वापरण्यास सुरुवात झाली. सध्या शहरात लुप्त पावलेल्या केबल वायरिंग पुन्हा आपापले पाय पसरविण्यास सुरुवात केली. याच वायफाय केबलच्या अस्ताव्यस्त वापरामुळे शहरातील सार्वजनिक पथ दिवे, फुटपाथ वरील खांबे, सिग्नल वरचे दिवे, चौकात चौकातील लाईटचे हाय मास्क पथदिवे, होर्डिंग, बिल्डिंग व झाडांना याच वायफाय केबलच्या वायरने विळखा पडला आहे.
फायबर इंटरनेट: सर्वोत्तम म्हणून उदय….
फायबर-ऑप्टिक इंटरनेट प्रकाश सिग्नल म्हणून डेटा पाठवण्यासाठी वेग आणि विश्वासार्हता आहे जी इतर कनेक्शन प्रकारांपेक्षा श्रेष्ठ आहे. फायबर-ऑप्टिक 10 गीगाबिट्स (10,000 मेगाबिट प्रति सेकंद) किंवा त्याहून अधिक जलद डाउनलोड गती देऊ शकते. एका मिनिटापेक्षा कमी वेळेत 2-तासांचा मूव्ही HD मध्ये डाउनलोड करण्यासाठी पुरेसा जलद — परंतु आपल्याला जास्तीत जास्त डाउनलोड गती मिळण्याची शक्यता आहे बहुतेक फायबर-ऑप्टिक प्रदात्यांकडून सुमारे 1,000 ते 5,000Mbps. स्पीडचा मंथली प्लॅन ग्राहकांना देण्यात येतो.
याच इंटरनेटच्या स्पीडमुळे शाळकरी मुलांना ऑनलाईन क्लासेस, अनेक महिलांनी सोशल मीडिया वरती स्वतःचे ब्रँडिंग करून घरच्याघरी व्यवसाय उभारले आहेत. अनेक क्लासेस ऑनलाईन पद्धतीने नवनवीन टेक्नॉलॉजी डिजिटल ई लर्निंग पद्धतीने शिकवले जातात. बहुतांश आयटी कर्मचारी आजही घरी बसून वर्क फ्रॉम होम करताना दिसून येत आहेत. अशा अनेक दैनंदिन गरजा नागरिकांच्या वायफाय सुविधेने पूर्ण होत असल्या तरीही शहराच्या सार्वजनिक जागेत, रस्ता क्रॉसिंग करण्याच्या ठिकाणी, सिग्नल वरती तसेच खांब्यावरून चिखलीच्या पद्धतीने केबल नेटवर्क अस्ताव्यस्त जाळे पसरले आहे.
यावरती महापालिका विभागाकडून कोणतीही कारवाई होताना दिसत नाही. इंटरनेट केबल व्यावसायिक मनमानी पद्धतीने नागरिकांना धोकादायक पद्धतीने केबलचे जाळे पसरले आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका अतिक्रमण विभागाकडून यावरती काही अंकुश राहणार का? जर यावरती कारवाई झाली नाही अथवा नियोजनबद्ध केबल लाईन टाकण्यास नियमावली बनवली जाणार नाही. तोपर्यंत पिंपरी चिंचवड शहर “मकडी के जाले” प्रमाणे वाय-फाय केबलने संपूर्ण शहर विणलेल्या जाळ्याप्रमाणे दिसेल. त्यामुळे यावरती तातडीने उपाययोजना होणे नागरिकांच्या हिताचे आहे.




