
ejanashakti | लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात आता विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहे. लवकरच विधानसभेच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. यामुळे सर्वच पक्ष आता रणनीती आखत आहेत. महायुतीसह महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या दौऱ्याला देखील आता सुरुवात झाली आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे देखील निवडणुकीसाठी दौरे करत आहेत. अशात भाजपला मोठा धक्का देणारी बातमी समोर आली आहे. भंडारामध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे. काही दिवसांपूर्वी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्त्वाचा राजीनामा देणारे भंडाऱ्यातील भाजपचे माजी नेते शिशुपाल पटले यांनी आपली पुढील राजकीय वाटचाल निश्चित केली आहे.
शिशुपाल पटले कॉँग्रेसमध्ये प्रवेश करणार?
शिशुपाल पटले हे आता कॉँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. या 15 ऑगस्ट किंवा 16 ऑगस्टरोजी ते कॉँग्रेसमध्ये प्रवेश करतील, असं म्हटलं जातंय.शिशुपाल पटले हे भंडारा जिल्ह्यातील एक बडा नेता म्हणून ओळखले जात होते. मात्र, त्यांनी भाजपच्या सदस्यत्त्वाचा राजीनामा दिला आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला विदर्भात मोठा फटका बसला.



