मुंबई : महाराष्ट्राच्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीने आज (दि.21) उमेदवारांची पाचवी यादी जाहीर केली आहे. यामध्ये 16 उमेदवारांचा समावेश करण्यात आला आहे. पाचव्या यादीमध्ये देखील वंचित बहुजन आघाडीने विविध समाज घटकांतील उमेदवार दिले आहेत.
वंचित बहुजन आघाडीच्या पाचव्या यादीतील उमेदवार
1) जगन देवराम सोनवणे – भुसावळ
2) डॉ. ऋतुजा चव्हाण – मेहकर
3) सुगत वाघमारे – मूर्तीजापूर
4) प्रशांत सुधीर गोळे – रिसोड
5) लोभसिंग राठोड – ओवळा माजिवडा
6) विक्रांत चिकणे – ऐरोली
7) परमेश्वर रणशुर – जोगेश्वरी पूर्व
8) राजेंद्र ससाणे – दिंडोशी
9) अजय रोकडे – मालाड
10) ॲड. संजीवकुमार कलकोरी – अंधेरी पूर्व
11) सागर गवई – घाटकोपर पश्चिम
12) सुनीता गायकवाड – घाटकोपर पूर्व
13) आनंद जाधव – चेंबूर
14) मंगलदास निकाळजे – बारामती
15) अण्णासाहेब शेलार – श्रीगोंदा
16) डॉ. शिवाजीराव देवनाळे – उदगीर
प्रकाश आंबेडकरांकडून पहिल्या तीन यादीतून 51 जणांची नावं जाहीर
प्रकाश आंबेडकरांच्या वंचितने यापूर्वी चार उमेदवार यादी जाहीर केल्या आहेत. चौथ्या यादीमध्ये शहादा, साखरी, तुमसर अर्जुनी मोरगाव, हदगाव, भोकर, कळमनुरी, सिल्लोड, कन्नड, औरंगाबाद पश्चिम, पैठण, महाड, गेवराई, आष्टी, कोरेगाव, कराड दक्षिण या मतदारसंघांचा समावेश आहे. वंचितकडून पहिल्या तीन यादीमधून 51 जणांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. चौथ्या यादीत 16 उमेदवारांचा समावेश आहे.
पहिल्या यादीत 11 उमेदवार जाहीर झाले होते
विधानसभा निवडणुकांसाठी वंचितच्या 11 उमेदवारांची पहिली यादी काही दिवसांपूर्वीच जाहीर केली होती. त्यामध्ये, वंचितकडून विधानसभा निवडणुकांसाठी प्रथमच तृतीयपंथी उमेदवाराला तिकीट देण्यात आलं होतं. रावेर मतदारसंघातून शमिभा पाटील यांना तिकीट देण्यात आलं आहे. शमिभा या तृतीयपंथीय (transgender) असून सामाजिक कार्यकर्त्या म्हणून त्यांची ओळख आहे. त्यानंतर 10 मुस्लीम उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर 30 उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली होती.



