
पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या चिखली येथील संभाजीनगर प्रभागात स्थित मैला जलशुद्धीकरण केंद्राच्या सांडपाणी साठवण तलावात एक अनोखा पर्यावरणीय प्रयोग राबविण्यात आला आहे. या तलावात तरंगते नर्सरी तयार करण्यात आले आहे, ज्यामुळे एरवी मैला मिश्रित पाण्याकडे पाहताना नको वाटणारी दृश्यता आता सुंदर फुलांच्या झाडांच्या नर्सरीने आकर्षक बनली आहे.
https://www.instagram.com/reel/DFg9GOoShNw-dwzDkr0EKspj8y2ED1_cR34JSE0/?igsh=dTg3YWxpN2M3cXoz
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीने या प्रकल्पाची कल्पना दिली आहे. ज्यामुळे महिला मिश्रित पाण्याची साठवण तलावाभोवती एक नविन जॉगिंग ट्रॅक देखील तयार केला गेला आहे. यामुळे शहरवासीयांना मॉर्निंग वॉक करताना केवळ पर्यावरण संरक्षणाचा अनुभवच मिळत नाही, तर एक सुंदर आणि शांत वातावरणही मिळते. तरंगत्या नर्सरीमुळे जॉगिंग ट्रॅकवरून जाताना डोळ्यांना एक सुखद अनुभव मिळतो आणि पर्यावरणीय दृष्टिकोनातून देखील याचे महत्त्व वाढले आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्रशासकीय काळात शहरात अनेक नवनवीन प्रयोग करण्यात आले. यामध्ये अतिक्रमण विभागाकडून गोळा केलेल्या लोखंडी साहित्यांना एकत्रित करून शहरात ठिकठिकाणी चौक सुशोभीकरण करताना वेगवेगळे पुतळे आणि आकृती बसवण्यात आले. असाच मैला मिश्रित पाण्यात तरंगत्या नर्सरीचा नवीन प्रयोग शहराच्या पर्यावरण संरक्षणासाठी महत्त्वपूर्ण ठरत आहे. ज्यामुळे निसर्गाशी नवा संबंध निर्माण होतो आणि शहरवासीयांना जीवनशैलीत सुधारणा होत आहे.
