चिखली : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या EWS घरकुल या ठिकाणी 158 सोसायटींच्या कामकाजासाठी “फेडरेशन ऑफ घरकुल”ची स्थापना करण्यात आली होती. मात्र, गेल्या आठ वर्षांपासून हे फेडरेशन फक्त नावावरच होते. परंतु, येथील सभासदांनी एकत्र येऊन “मी म्हणजे घरकुल नव्हे तर आम्ही म्हणजे घरकुल” या उद्दिष्टास साध्य केले.
नवीन फेडरेशनच्या निवडणुकीत घरकुल विकास पॅनलने शानदार विजय मिळवला. या पॅनलचे अध्यक्ष म्हणून अशोक जगन्नाथ मगर, सचिव म्हणून दशरथ अश्रुबा शिंदे, आणि खजिनदार म्हणून विनायकराव लाटे यांची निवड झाली. तसेच, पुढील संचालक म्हणून निवड झाली:
1. सुजाता हरिदास विधाते
2. सुदाम निंबा जाधव
3. युवराज यशवंत निलवर्ण
4. निर्जला इंद्रसेन चौधरी
5. रुक्मिणी किसनराव गवळी
6. संतोष मारुती दिवटे
7. शिवाजी गुंडेराव भुजबळ
8. दत्तात्रय शिंदे
9. अनमोल नागाप्पा
या सर्व संचालकांना पाठींबा देणारे सदस्य होते: आबासाहेब गवळी, ऋषिकेश जाधव, शिवाजी खराटे, भगवान पारे, रविंद्र लाडुकर, संतोष माळी, सुरेश वैरागर इत्यादी.
या निवडणुकीत घरकुल करांनी आपले समाधान व्यक्त केले आणि आगामी काळात हे नविन संचालक चांगले कार्य करतील, अशी अपेक्षा व्यक्त केली. अध्यक्ष अशोक मगर यांनीही या संधीचे स्वागत करत आगामी काळात घरकुलला एक वेगळ्या उंचीवर नेऊन चांगले कार्य करुन घरकुल करांची मने जिंकण्याची अपेक्षा व्यक्त केली. तसेच निवडणूक प्रक्रियेत सहकार्य करणारे सर्व सदस्य व घरकुल करांचे मनापासून आभार व्यक्त केले.




