मुंबई – महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर भारतीय पक्षाचे असून जनता लक्ष विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा सरकार बनविण्यासाठी “मी पुन्हा येईन” चा प्लॅन तयार केला आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार , देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस राबविणार आहेत. मध्य प्रदेशात काँग्रेस आमदारांनी ज्योतिरादित्य शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली पक्ष आणि आमदारकीचा राजीनामा दिला होता. त्यांच्या राजीनाम्यानंतर कमलनाथ सरकार कोसळले. तसेच महाराष्ट्रात शिवसेनेच्या बंडखोर आमदारांशी हातमिळवणी करत ‘ शिंदे पॅटर्न ‘ भाजपा राबवण्याची शक्यता आहे.
सेनेतील आमदारांनी राजीनामा दिल्यास महाविकास आघाडी सरकार अल्पमतामध्ये येईल त्यानंतर विधानसभेत बहुमत सिद्ध करू शकणार नाही. अशावेळी या परिस्थितीचा फायदा घेत भाजपा सरकार बनवण्याचा दावा करेल . राज्यातील पोटनिवडणुकांमध्ये जास्तीत जास्त बंडखोर आमदार विजयी करण्याचा भाजपाचा प्रयत्न असेल अशी चर्चा आहे.



