नवी दिल्ली : भारतातील बऱ्याच बलाढ्य सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांची स्थापना आणि पुनर्जीवन करणारे ज्येष्ठ व्यवस्थापक वेंकटरामनन कृष्णमूर्ती यांचे रविवारी अल्पशा आजारानंतर निधन झाले ते ९७ वर्षांचे होते. त्याचे चेन्नई येथील निवासस्थानी निधन झाले.
कृष्णमूर्ती यांनी दुसऱ्या महायुद्धात टेक्निशियन म्हणून भाग घेतला होता . नंतर त्यांनी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये पदविका घेतली . १९५४ मध्ये ते नियोजन आयोगामध्ये ऊर्जा क्षेत्राचे प्रमुख म्हणून नियुक्त झाले. ते मारुती उद्योग लिमिटेडचे संस्थापक अध्यक्ष होते. त्यांनी स्टील अॅथॉरिटी ऑफ इंडिया , गॅस अॅथॉरिटी ऑफ इंडिया हा कंपन्यांच्या पुनरुज्जीवनात महत्त्वाचा वाटा उचलला.