तळेगांव स्टेशन (प्रतिनिधी -संदीप गाडेकर) पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ आणि जिल्हा शिक्षक लोकशाही आघाडी (टीडीएफ) यांच्यावतीने जिल्हा पातळीवरील गुणवंत शिक्षक पुरस्कार जाहीर झाले आहेत. रविवारी (२ ऑक्टोबर) भोर येथे या पुरस्काराचे वितरण होणार आहे, अशी माहिती संघाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव ताकवले, आणि टीडीएफचे जिल्हाध्यक्ष मुरलीधर मांजरे यांनी दिली.
आमदार संग्राम थोपटे यांच्या हस्ते पुरस्कार वितरण होईल. यावेळी टीडीएफचे राज्याचे कार्याध्यक्ष जी. के. थोरात, विश्वस्त के. एम. ढोमसे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
पुरस्कारप्राप्त शिक्षकांची नावे पुढीलप्रमाणे –
मुख्याध्यापक – लक्ष्मण वराळे (नाटंबी, भोर), ज्ञानेश्वर पानसरे (ओतूर, जुन्नर), राजेंद्र बोंडे (गंगापूर, आंबेगाव), मधुकर जगताप (हरणी, पुरंदर), संजय ओव्हाळ (कोथुर्णे, मावळ), रमेश मचाले (भवानीनगर, इंदापूर), छाया लाटे (मरकळ, खेड), संजय बोडरे (उरवडे, मुळशी), रामदास चव्हाण (मांडवगण फराटा, शिरूर), संदीप जगताप (लोणी भापकर, बारामती), सुभाष वाल्हेकर (सोंडे माथनी, वेल्हा), महेश पवार (कोंढणपूर, हवेली)
मुळशी तालुका – ज्योती बढे (पिरंगुट), तानाजी सर्जेराव (मुठा), संजय कुलथे (आंबवणे), मच्छिंद्र ओव्हाळ (माण),
दौंड तालुका – राजेंद्र जगताप (सहजपूर), वैशाली खिवंसरा (वरवंड), काकासाहेब ढवळे (कासुर्डी), नामदेव खडके (कुरकुंभ), गणेश होले (कानगाव),
पुरंदर तालुका – रामप्रभू पेंटकर (माहूर), हेमलता येळे (वाघापूर), बाबासाहेब कुंभार (वाल्हे), सचिन धनवट (पिंपळे),
खेड तालुका – सुनील घुमटकर (वाफगाव), दिगंबर पाटील (पाडळी), शिवाजी गायकवाड (वेताळे), अजय पोंदे (कनेरसर),
बारामती तालुका – कल्याणी माने (उंडवडी कडे पठार), राजेंद्र पैठणकर (काऱ्हाटी), रामचंद्र शिंगाडे (काटेवाडी), सुभाष लकडे (सांगवी),
हवेली तालुका – राजेंद्र जायभाय (वाघोली), सुभाष दामगुडे (वाघोली), संजय कोपनर (शिंदवणे), रूपाली खानदेशे (उरुळी कांचन)
जुन्नर तालुका – सरीता अबक (आळे), विजय घोलप (रानमळा), लक्ष्मण थोरवे (उंब्रज नंबर 1), कैलास दाभाडे (पारूंडे),
इंदापूर तालुका – धनराज चव्हाण (गोतोंडी), शैलजा वरकुटे (लासुर्णे), सुनील माळी (इंदापूर), परशुराम घाडगे (सणसर),
वेल्हा तालुका – महादेव बेंद्रे (आंबवणे), विलास वंजारी (वेल्हा), राजेंद्र रांजणे (दापोडे), उषा सणस (वांगणी),
भोर तालुका – गोपीचंद म्हस्के (भोंगवली), चंद्रकांत पारवे (संगमनेर), कुंदा कुंभार (वाठार हिंगे), एकनाथ पाटील (आळंदे), संदीप नेवसे (वरवे),
शिरूर तालुका – गणेश मांढरे (शिक्रापूर), मंगल मोकाशी (वढू बुद्रूक), नवनाथ राऊत (वडनेर), पांडुरंग पवार (सणसवाडी),
आंबेगाव तालुका – शिवाजी लोहोट (रांजणी), शिल्पा कदम (पेठ), तानाजी बोऱ्हाडे (गोहे बुद्रुक), राधाकृष्ण कानवडे (अवसरी बुद्रुक),
मावळ तालुका – स्नेहल बाळसराफ (तळेगाव दाभाडे), प्रवीणकुमार हुलावळे (देवघर), अशोक काळे (उर्से), सुजित सूर्यवंशी (लोणावळा).




