मुंबई : जर तुम्हाला तुमच्या मुलांना चांगलं शिक्षण द्यायचं असेल, परंतु तुमच्याकडे पैसे नाहीत तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. यासाठी देशातील काही बँका मुलांच्या चांगल्या शिक्षणासाठी कमी व्याजावर शैक्षणिक कर्ज देत आहेत. ज्याच्या मदतीनं तुम्ही बँकेकडून शैक्षणिक कर्ज घेऊन तुमच्या मुलांना चांगलं शिक्षण मिळवून देऊ शकाल. आपल्या देशातील बहुतेक पालकांना त्यांच्या मुलांना सर्वोत्तम शिक्षण द्यायचं असतं, परंतु उच्च शिक्षण घेण्यासाठी बरेच पैसे खर्च होतात. त्यामुळं देशभरातील हजारो मुलं दरवर्षी पैशाअभावी शिक्षणाला मुकतात आणि त्यांना चांगलं शिक्षण घेता येत नाही.
वास्तविक भारतात विविध कोर्स आणि पदवी अभ्यासासाठी शैक्षणिक कर्जाची प्रथा आता सामान्य झाली आहे. शैक्षणिक कर्जे सहसा अभ्यासक्रमाशी संबंधित खर्चासाठी वापरली जातात. यामध्ये शिकवणी, निवास, कपडे, लायब्ररी आणि प्रयोगशाळांसाठी शुल्क, पुस्तके आणि बरंच काही समाविष्ट असतं. आज आम्ही तुम्हाला अशा बँकांबद्दल सांगणार आहो, ज्या मुलांच्या शिक्षणासाठी कमी व्याजदरात शैक्षणिक कर्ज देत आहेत.
सेंट्रल बँक ऑफ इंडिया..
आकडेवारीनुसार मुलांना चांगलं शिक्षण मिळावं, यासाठी सेंट्रल बँक ऑफ इंडिया सर्वात कमी 6.95 टक्के व्याजदरानं शैक्षणिक कर्ज देत आहे. बँक 7 वर्षांसाठी 20 लाखांपर्यंत कर्ज देते. या कर्जाची परतफेड समान मासिक हप्त्यात (रु. 30,136) केली जाऊ शकते.
पंजाब नॅशनल बँक-
पंजाब नॅशनल बँक (PNB) 7.45 टक्के व्याज दरानं शैक्षणिक कर्ज देत आहे. 20 लाखांच्या कर्जासाठी एकूण EMI 30,627 रुपये आहे.
स्टेट बँक ऑफ इंडिया-
SBI विद्यार्थ्यांना 7.5 टक्के व्याज दरानं शैक्षणिक कर्ज देते, जे सामान्य व्याजदरापेक्षा किंचित जास्त आहे. या कर्जाचा ईएमआय 30,677 रुपये आहे. याशिवाय युनियन बँक ऑफ इंडिया आणि आयडीबीआय बँक देखील याच व्याजदरानं शैक्षणिक कर्ज देतात.
इंडियन बँक-
इंडियन बँक 20 लाख रुपयांच्या सात वर्षांच्या कर्जासाठी 7.9 टक्के व्याज आकारते. तिचा ईएमआय 31,073 रुपये आहे.
बँक ऑफ बडोदा-
बँक ऑफ बडोदा सात वर्षांच्या कालावधीसाठी 20 लाख रुपयांच्या शैक्षणिक कर्जावर 7.9 टक्के व्याज आकारते. बँक ऑफ बडोदा कर्जाचा ईएमआय 31,073 रुपये आहे.
बीओआय–
या सरकारी बँकेचा व्याजदर 8.25 टक्के आहे. तर हप्ता एकूण 31,422 रुपये आहे.
कॅनरा बँक-
कॅनरा बँकेकडून 20 लाख रुपये शैक्षणिक कर्ज सात वर्षांच्या परतफेडीच्या कालावधीसह 8.3 टक्के व्याजदरासह देते. त्यांच्या कर्जाचा एकूण ईएमआय 31,472 रुपये आहे.
बँक ऑफ महाराष्ट्र शैक्षणिक कर्ज-
शैक्षणिक कर्जासाठी बँक ऑफ महाराष्ट्रचा व्याजदर 8.35 टक्के आहे. त्याचा मासिक हप्ता 31,522 रुपये आहे.


