पिंपरी (प्रतिनिधी) पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या गट व आणि क संवर्गातील ३८६ पदासांठी महापालिकेने अर्ज मागविले आहेत. या पदांसाठी १ लाख ३० हजार ४७० इच्छूकांनी अर्ज केले आहेत.
मात्र, भरती प्रक्रियेसाठी अर्ज केलेल्या इच्छूकांना परिक्षा शुल्क भरताना अडचणी येत आहेत. त्यामुळे महापालिकेने भरती प्रक्रियेसाठी नेमलेल्या कंपनीच्या गलथान कारभाराचा इच्छूकांनामोठा फटका बसला असून मनःस्तापही सहन करावा लागत आहे.
भरती प्रक्रियेसाठी ऑनलाइन अर्ज भरला. मात्र, परिक्षा शुल्क भरण्यास अडचणी येत असल्याचे निदर्शास आले आहेत. त्यामुळे परिक्षा शुल्क भरण्यास २६ सप्टेंबर सायंकाळी ६ वाजेपर्यंत मुदत देण्यात आली आहे. या मुदतीमध्ये उमेदवारांनी परिक्षा शुल्क भरावे.. त्यानंतर कोणतीही मुदतवाढ देण्यात येणार नाही.
• बाळासाहेब खांडेकर,
सहाय्यक आयुक्त, प्रशासन विभाग
इच्छुकांना मनस्ताप : ३८६ रिक्त जागा भरणार
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या गट ब आणि क संवर्गातील १६ पदांच्या ३८६ रिक्त जागा सरळसेवेने भरण्यात येणार आहेत. त्या अनुषंगाने वर्तमानपत्रात जाहिरात प्रसिद्ध केली असून अर्हताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. यासाठी महापालिकेने एकदा मुदतवाढ दिली आहे. त्यानंतरही या पदांसाठी अर्ज भरताना इच्छूकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. दरम्यान, या पदांसाठी ऑनलाईन भरतीचे सर्व टप्प्याटप्याने होणार आहे.




