वडगाव मावळ (वार्ताहर) – प्रधानमंत्री टी. बी. मुक्त भारत अभियान अंतर्गत सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन आयोजित निक्षय मित्र सन्मान आणि पोषक आहार वितरण सोहळा राजभवन मुंबई येथील दरबार सभागृहात संपन्न झाला. यामध्ये राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते वडगाव मावळ येथील नगरसेवक प्रवीण चव्हाण, माजी नगरसेवक प्रसाद पिंगळे व भूषण मुथा यांना निक्षय मित्र म्हणून गौरविण्यात आले.
सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासनाचे मुख्य सचिव प्रदीप व्यास, महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभागाचे आयुक्त डॉ.रामा स्वामी, महाराष्ट्र राज्य क्षयरोग विभाग सहसंचालक रामजी अडकेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला.
पुणे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार यांच्या मार्गदर्शनाखाली, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. सुनील पोटे, जिल्हा वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय दराडे, मावळ तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे, वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक पी. आर. वंजारी, मावळ तालुका क्षयरोग विभागाचे अधिकारी यांचे सहकार्य यावेळी लाभले.




