वडगाव मावळ (वार्ताहर) मावळचे आमदार सुनिल शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त श्री विठ्ठल परिवार, मावळ व मोरया प्रतिष्ठान यांच्या वतीने मावळ तालुका मर्यादित भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
ही स्पर्धा शनिवारी (दि. ८) व रविवारी (दि. ९) सकाळी ९ ते सायंकाळी ५ पर्यंत स्पर्धेची वेळ असणार आहे. श्री पोटोबा महाराज मंदिरांच्या प्रांगणात संपन्न होणार आहे. अशी माहिती संयोजकानी दिली आहे.
स्पर्धेतील विजेत्या भजनी मंडळास प्रथम क्रमांक पंचवीस हजार, द्वितीय क्रमांक एकवीस हजार तिसरे, चौथे अशी बक्षीस वितरण करण्यात येणार आहे.




