कार्ला (वार्ताहर)– मुंढावरे येथील वेट एन जॉय वाटरपार्क च्या विरोधात मावळातील भूमिपुत्रांचे गेली सात दिवसांपासून ठिय्या आंदोलन सुरु आहे. अद्यापही हे २२ कामगार न्याय मिळण्याच्या प्रतीक्षेत असून, आमरण उपोषणाचा इशारा या आंदोलनकर्त्यांनी दिला आहे.
उलट त्यांच्यावरच गुन्हा दाखल करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले. या आंदोलकांच्या न्याय हक्कासाठी माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते आंदोलकांबरोबर खंबीर पणे उभे आहोत. सात दिवसाच्या ठिय्या आंदोलनानंतरही या भूमिपुत्रांना न्याय अद्याप मिळालेला नाही; पुढील दोन दिवसांत न्याय न मिळाल्यास आम्ही आमरण उपोषणाला बसणार आहे.
उपोषण करणार असल्याचे संजय गांधी निराधार योजनचे माजी अध्यक्ष किरण राक्षे व भाजपा कामगार आघाडीचे अध्यक्ष अमोल भेगडे यांनी सांगितले. यावेळी भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष संदीप काकडे, मावळ भाजपा विद्यार्थी आघाडी अध्यक्ष या भूमिपूत्रांना न्याय द्या अभिमन्यू शिंदे, सरचिटणीस गणेश राजकारण नको. या युवकांना ठाकर, शेखर वाघमारे, बाळासाहेब वाघमारे, किसन येवले आदी उपस्थित होते.




