पिंपरी (प्रतिनिधी) पिंपळे गुरव येथील भवानी मंदिर ते दशक्रिया घाट या दरम्यान एका गॅरेजवाल्याने पदपथावर वाहने उभी करीत अतिक्रमण केले आहे. ते अतिक्रमण हटविण्यात यावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
स्थापत्य विभागच्यावतीने शहरात विविध विकासकामे सुरू आहेत. पिंपळे गुरव दशक्रिया घाट ते तुळजाभवानी मंदीर या दरम्यानही गेल्या अनेक दिवसापासून काम सुरू आहे. या कामासाठी खोदलेला पदपथ अद्यापही तसाच आहे. त्यामुळे नागरिकांना पदपथाचा वापर करता येत नाही. तसेच याठिकाणी असलेल्या एका गॅरेज मालकानेही आपल्याकडे दुरुस्तीसाठी आलेली वाहनेही पदपथावर उभी केली आहे. याचाही कायमच पादचाऱ्यांना त्रास सहन करावा लागतो.
या समस्यांकडे महापालिकेने लक्ष द्यावे, अशी मागणी ड क्षेत्रीय कार्यालयाचे अधिकारी उमाकांत गायकवाड यांच्याकडे निवेदनाद्वारे राष्ट्रवादी काँग्रेसचे चिंचवड उपाध्यक्ष प्रदीप गायकवाड यांनी केली आहे.




