नाशिक : नाशिक-औरंगाबाद मार्गावर साखर झोपेत असताना पहाटेच्या सुमारास खासगी बसला अचानक आग लागली. या अपघातात १० जणांचा मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. ही बस यवतमाळहून मुंबईकडे निघाली होती. मात्र वाटेतच बसला आग लागली असल्याची माहिती समोर येतेय. हा अपघात कसा घडला याबाबत महत्त्वाची माहिती समोर येत आहे.
पहाटे ४ वाजून २० मिनिटांनी हा अपघात घडला आहे. चिंतामणी ट्रॅव्हल्सची ही बस असून यवतमाळच्या पुसदकडून मुंबईकडे निघाली होती. मात्र, नाशिकच्या औरंगाबाद रोडवरील मिरची हॉटेल जवळ बसचा अपघात झाला. आयशर ट्रक आणि बसमध्ये जोरात धडक बसल्यामुळं हा अपघात घडला. अपघातानंतर बसला भीषण आग लागली. पाहता पाहता ही आग पसरत गेली आणि संपूर्ण बस आगीच्या भक्ष्यस्थानी सापडली.



