पिंपरी : निगडीतील टँकर अपघातास तेथील अर्धवट काम कारणीभूत आहे. पालिकेच्या ठेकेदारांची भुयारी मार्ग काम मुदत संपली असून भुयारी मार्ग काम अर्धवट ठेवल्यामुळे दोन अपघात झाले असून दोन जण ठार झाले आहेत. दोन दिवसांपूर्वी गॅस सिलिंडर टैंकर पलटी झाला होता. यामध्ये गॅस गळती वेळेत रोखली नसती तर शेकडो लोकांचे प्राण या घटनेने गेले असते.
जीवाशी खेळण्यात करणाऱ्या महापालिकेवर आणि त्या ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सचिन काळभोर यांनी केली आहे. काळभोर यांनी महापालिका प्रशासनास पत्र दिले आहे. भक्ती-शक्ती उड्डाणपूल व मधुकर पवळे उड्डाणपूल येथील भुयारी मार्ग काम अर्धवट राहिल्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. यामुळे वाहतूक अनेक वेळा विस्कळीत होते.

भुयारी मार्ग काम सुरू असलेल्या ठिकाणी दिशादर्शक फलक लावला नाही. गतिरोधक बसविण्यात आले असून, भक्ती-शक्ती उड्डाण पूल व मधुकर पवळे उड्डाण पूल ह्या ठिकाणी भक्ती-शक्ती मार्गे निगडी येथील मधुकर पवळे उड्डाण पूल इन आऊट बंद केले आहेत. वाहतूक व्यवस्था कोलमडून पडली आहे. भक्ती-शक्ती उड्डाण पूल ते निगडी गावठाण भागात बाहेर निघण्यासाठी मार्गपत्रे लावून बंद केला आहे.

यावेळी सामाजिक कार्यकर्ते सचिन काळभोर, सचिन चिखले, रोहिदास शिवणेकर, निगडी व्यापारी संघटना अध्यक्ष रिक्षा चालक जावेद शेख, अभिजित पुरी, दादू सगरे, तानाजी जाभंळकर यांनी मदत केली, असेही काळभोर यांनी सांगितले.




