महिलांना आदर दिला गेला पाहिजे. राजकारण असो किंवा इतर कुठलंही क्षेत्र असो महिलांकडे बघण्याचा दृष्टीकोन फारसा चांगला नाही. पण एक स्त्री शिकली तर ती सगळं वातावरण बदलू शकते. तसंच तिच्यामध्ये ती क्षमता असते. तिला तिच्या कपड्यांवरुन किंवा वागण्यावरुन कुठलंही लेबल लावायला नको असं मत खासदार प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केलं आहे.
काय म्हणाल्या प्रणिती शिंदे?
एक स्त्री घरातलं वातावरण बदलू शकते. शाळेत शिकवलं जात नाही की महिलांचा आदर करावा. मुलांना घडवलं कसं जातं ते महत्त्वाचं आहे. त्याला घरात हे शिकवलं गेलं पाहिजे. वडिलांनी मुलाला शिकवलं की महिलेचा आदर कर, तर ८० टक्के महिलांवर होणारे अत्याचार बंद होतील असं मत प्रणिती शिंदे यांनी म्हटलं आहे.



