प्रभाग १६ रावेत किवळे मामुर्डी
पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक १६ आदर्श नगर–किवळे परिसरात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा प्रचार दौरा उत्साहात पार पडला. घरोघरी भेटी देत नागरिकांशी थेट संवाद साधत स्थानिक प्रश्न, समस्या आणि विकास आराखड्याबाबत उमेदवार व पदाधिकाऱ्यांनी जनतेशी साधलेला संवाद लक्षवेधी ठरला.
या प्रभागातून शिवसेनेतर्फे सौ. रेश्मा बापूजी कातळे यांना अधिकृत उमेदवारी जाहीर झाली असून त्यांनी स्वच्छता, पाणीपुरवठा, दर्जेदार रस्ते, आरोग्य सुविधा, महिला सक्षमीकरण आणि युवकांसाठी संधी निर्माण करण्याचे भरीव आश्वासन मतदारांसमोर मांडले. “विश्वासातून विकास आणि विकासातून न्याय” हा संदेश प्रचारातून देण्यात आला.
दरम्यान, या प्रभागातील ईव्हीएम संयोजनाने समर्थकांचे लक्ष वेधले आहे.
प्रभाग क्रमांक 16 मधून शिवसेनेचे अधिकृत उमेदवार म्हणून
- अ गट – बाळासाहेब ओव्हाळ (क्रमांक १)
- ब गट – ऐश्वर्या तरस (क्रमांक २)
- क गट – रेश्मा कातळे (क्रमांक १)
- ड गट – निलेश तरस (क्रमांक २)
अशी बॅलेट मशीनवरील ‘१–२’ आणि ‘१–२’ रचना योगायोग नसून “१२–१२ पॅटर्न” विरोधकांच्या बारा वाजवण्यासाठी आणि शिवसेनेसाठी शुभसंकेत आहे. अशा समर्थकांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे. या आकड्यांच्या जुळवाजुळवीने कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास अधिकच वाढला असून “हा पॅटर्न विजयाचा संकेत” असल्याचा दावा शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून केला जात आहे.
प्रचार दौऱ्याला मोठ्या प्रमाणावर उपस्थिती असणाऱ्या शिवसैनिकांनी “खिच के तान धनुष्यबाण” घोषणांनी प्रभाग १६ मधील निवडणुकीत शिवसेना मय वातावरण तयार केले आहे. त्यांना मिळणाऱ्या प्रतिसादामुळे शिवसैनिकांचा उत्साह प्रचंड वाढला आहे. आगामी मतदानात मतदारांची पसंती कोणाकडे झुकते, याकडे आता संपूर्ण प्रभागाचे लक्ष लागले आहे.



