प्रभाग १६ रावेत, किवळे, मामुर्डी
पिंपरी–चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक १६ (रावेत – किवळे – मामुर्डी) येथे तिरंगी लढत अधिक रंगतदार बनली असून धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढवणाऱ्या शिवसेना उमेदवारांनी प्रचारात मोठी आघाडी घेतल्याचे चित्र दिसू लागले आहे. सत्तेतील तिन्ही पक्ष स्वतंत्र पॅनलच्या माध्यमातून मैदानात उतरले असले तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्णयानंतर ‘लाडक्या बहिणी’च्या समर्थनामुळे शिवसेनेच्या पॅनलभोवती जोरदार सकारात्मक वातावरण निर्माण झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
नगरपालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 16 मधून..
अ गट — बाळासाहेब ओव्हाळ
ब गट — ऐश्वर्या राजेंद्र तरस
क गट — रेश्मा बापूजी कातळे
ड गट — निलेश गुलाब तरस
अशी सर्व युवक कार्यकर्त्यांना उमेदवारी दिल्यामुळे प्रभागातील युवा वर्ग, महिला वर्ग पॅनेलसोबत राहताना दिसत आहे. तिरंगी लढतीत विजयासाठी शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये आत्मविश्वास अधिक दृढ झाल्याचे दिसते.
बापूजी कातळे पॅनलचे नेतृत्वात शाश्वत विकासाचे हमी…
या पॅनलमधील सर्वाधिक चर्चेत असलेल्या बापूजी कातळे यांच्या कार्यकुशलतेमुळे आणि युवक संघटनात्मक बळामुळे स्थानिक तरुणांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. लाडक्या वहिनींसह युवकांच्या उत्स्फूर्त समर्थनामुळे प्रचारात नवचैतन्य निर्माण झाले असून शिवसेनेभोवती ‘पॉझिटिव्ह वेव्ह’ तयार झाल्याचे चित्र स्पष्टपणे जाणवते. सध्या प्रभाग १६ मधील मतदारांमध्ये उत्सुकता वाढली असून तिरंगी लढतीचा निकाल कोणाच्या बाजूने झुकतो, हे निकालांनंतरच स्पष्ट होणार आहे. मात्र प्रचाराच्या टप्प्यावर शिवसेना पॅनलकडे वेध लागले असल्याचे नक्की.




