पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या निमित्तानं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रभाग क्र. ८ मधील अधिकृत उमेदवार श्रीमती. सीमा रवींद्र सावळे, श्रीमती. राजश्री अरविंद गागरे, श्रीमती. अश्विनी संजय वाबळे, श्री. तुषार भिवाजी सहाने यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत उपस्थित पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांना संबोधित केलं.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचा कारभार सांभाळण्यासाठी काही अनुभवी आणि काही नव्या दमाचे लोक गरजेचे आहेत. गेल्या काळात एवढे पैसे खर्च झाले, कर्जरोखे काढावे लागले, पण प्रत्यक्षात काम झालं नाही. ७० लाखांचा पूल ७ कोटींना गेला, शहर लुटलं गेलं. हा भ्रष्ट कारभार थांबवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस मैदानात उतरली आहे.
आम्ही पिंपरी-चिंचवडसाठी ठोस जाहीरनामा सादर केला आहे. ‘एक अलार्म, पाच काम’, असा कामांचा राष्ट्रवादी काँग्रेसचा संकल्प आहे. दररोज नळाद्वारे पाणी, टँकर माफिया कायमचा बंद, ट्रॅफिक व खड्डेमुक्त शहर, नियमित स्वच्छता, हायटेक आरोग्य सुविधा आणि प्रदूषण कमी करण्यासाठी PMPML व मेट्रो मोफत प्रवास आम्ही उपलब्ध करून देणार आहोत.
आम्ही चुकीची कामं होऊ देणार नाही. आता बदल करायची वेळ आली आहे. येत्या १५ जानेवारीला मतदार राजानं आपली ताकद दाखवावी. सर्वांनी घड्याळाच्या चिन्हासमोरील बटण दाबा आणि प्रभाग क्र. ८ मधील आमच्या उमेदवारांना मोठ्या मताधिक्यानं निवडून द्या, असं आवाहन अजित पवार यांनी केले आहे.



