प्रभाग १६ रावेत, किवळे, मामुर्डी
पिंपरी-चिंचवड : रावेत, किवळे, मामुर्डी प्रभाग क्रमांक १६ मध्ये भारतीय जनता पक्षाने विकास, पारदर्शकता आणि सेवा या मुद्द्यांवर आधारित निवडणूक रणनिती मांडली असून, या प्रभागातून चार उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. यावेळी पालिकेच्या केलेल्या कामांचा सविस्तर अहवाल जनतेसमोर मांडत त्यांनी विकासाच्या मुद्द्यावर ठाम भूमिका घेतली आहे.
प्रभागातील भाजप उमेदवार महापालिकेत केंद्र व राज्य सरकारच्या सहकार्याने प्रभागाचा विकास वेगाने पुढे नेतील, असा दृढ विश्वास नागरिकांनी व्यक्त केला. यावेळी प्रभाग १६ मधील उमेदवार श्री. दिपक मधुकर भोंडवे, श्री. धर्मपाल तंतरपाळे, सौ. शिल्पा मोहन राऊत आणि सौ. संगीता राजेंद्र भोंडवे यांच्या कार्यक्षम नेतृत्वाचे विशेष कौतुक करत मतदारांना ‘कमळ’ चिन्हासमोरील बटण दाबून प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन करण्यात आले.
प्रभागातील प्रत्येक घरोघरी, सोसायटी मधील नागरिकांनी स्पष्ट केले. विरोधकांच्या टीकेपेक्षा नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसणारे समाधान अधिक महत्त्वाचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. उमेदवारांनी चौघेही मिळून प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी काम करण्याचा निर्धार व्यक्त करत आहेत.
निवडून आल्यानंतरच्या पहिल्या १०० दिवसांत प्रभाग क्रमांक १६ मधील प्रलंबित कामे पूर्ण करणे, रस्ते, पेव्हिंग ब्लॉक्स, पाणीपुरवठा व दैनंदिन देखभाल-दुरुस्तीची कामे तातडीने मार्गी लावणे, हे प्रमुख प्राधान्यक्रम असल्याचे उमेदवारांकडून सांगण्यात आले.
कोरोनाच्या काळात भाजपच्या या उमेदवारांनी सामाजिक बांधिलकी जपत मोठ्या प्रमाणात मदतकार्य केले. दररोज हजारो गरजू नागरिकांना जेवण व जीवनावश्यक वस्तूंच्या किट्सचे वाटप करण्यात आले. भारतीय जनता पक्ष, कमळ हे निवडणूक चिन्ह आणि विकासाचा स्पष्ट अजेंडा घेऊन मैदानात उतरलेले हे चारही उमेदवार प्रभाग क्रमांक १६ मध्ये मतदारांचा विश्वास संपादन करत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.
“रावेत, किवळे, मामुर्डी प्रभाग क्रमांक १६ मधील प्रत्येक नागरिकाचा विकास हा माझा शब्द आहे. केवळ आश्वासनं नाही, तर वेळेत, दर्जेदार आणि पारदर्शक काम करून दाखवणं हीच आमची बांधिलकी आहे. जनतेचा विश्वास हाच माझा खरा विजय आहे प्रभाग क्रमांक 16 मधील चारही भाजपचे उमेदवार निवडून येतील असा विश्वास नागरिकांमधून व्यक्त होताना दिसला आहे.




