प्रभाग क्रमांक १६ किवळे रावेत मामुर्डी
पिंपरी : प्रभाग क्रमांक १६ मध्ये भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवारांनी भव्य व दिव्य रॅली काढून प्रचाराची सांगता केली. या रॅलीमुळे संपूर्ण प्रभागात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार धर्मपाल तंतरपाळे, शिल्पा राऊत, संगीता भोंडवे आणि दीपक भोंडवे यांनी एकत्रितपणे रॅलीद्वारे मतदारांशी थेट संवाद साधत विकासाचे संकल्प मांडले. ढोल-ताशे, घोषणा, पक्षध्वज आणि कार्यकर्त्यांच्या प्रचंड उपस्थितीमुळे रॅलीला भव्य स्वरूप प्राप्त झाले.
रॅली दरम्यान उमेदवारांनी प्रभागातील विकासकामे, मूलभूत सुविधा, स्वच्छता, रस्ते, पाणीपुरवठा आणि नागरिकांच्या प्रश्नांवर भर देत भाजपच्या विकासाभिमुख धोरणांची माहिती दिली. “विकास, विश्वास आणि पारदर्शकता” या त्रिसूत्रीवर काम करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात काढण्यात आलेल्या या रॅलीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ठिकठिकाणी नागरिकांनी उमेदवारांचे स्वागत करत शुभेच्छा दिल्या. या भव्य रॅलीने भाजपच्या प्रचाराला निर्णायक वळण मिळाल्याचे चित्र दिसून आले.




