पिंपळे सौदागर : येथील यश संकुल सोसायटीसमोरील मोकळ्या जागेत महावितरणच्या ट्रान्सफॉर्मरलगत अचानक आग लागल्याची घटना घडली. परिसरातील नागरिकांनी ही बाब तात्काळ लक्षात घेऊन माहिती दिल्यानंतर स्थानिक नगरसेवक नाना काटे यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखत तत्काळ महावितरण (MSEB) व अग्निशमन विभागाशी संपर्क साधला.
माहिती मिळताच अग्निशमन दल व महावितरणचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अत्यंत वेगाने आणि समन्वयाने केलेल्या प्रयत्नांमुळे आगीवर लवकर नियंत्रण मिळवण्यात यश आले. त्यामुळे संभाव्य मोठी दुर्घटना टळली असून नागरिकांचा जीवित व मालमत्तेचा धोका टाळण्यात आला.
🌕 *पिंपळे सौदागरमध्ये ट्रान्सफॉर्मर रूमला आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला* https://emaharashtramaza.com/?p=183092
या घटनेदरम्यान स्थानिक नागरिकांनीही तत्परता दाखवत प्रशासनाला सहकार्य केले. वेळेवर मिळालेल्या मदतीमुळे परिस्थिती नियंत्रणात आणणे शक्य झाले.
घटनेनंतर नगरसेवक नाना काटे यांनी अग्निशमन दल, महावितरणचे कर्मचारी तसेच सहकार्य करणाऱ्या सर्व नागरिकांचे मनःपूर्वक आभार मानले. तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहनही त्यांनी केले.



