किरकोळ कारणावरून मित्रांनीच मित्राचा खून केला. घटना घडण्यापूर्वी एका मित्राच्या वाढदिवसानिमित्त सर्वांनी सोबत मिळून हॉटेलमध्ये जेवण केले. त्यानंतर आपापसात झालेल्या भांडणातून हा प्रकार घडला. आज (रविवारी, दि.03) दुपारच्या सुमारास भोसरी येथे ही घटना घडली.
अतिक सय्यद (वय 27, रा. भोसरी, मुळगाव – बुलढाणा) असे खून झालेल्या तरूणाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मित्राचा वाढदिवसानिमित्त सर्व मित्र हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी गेले. जेवण केल्यानंतर दारूच्या नशेत असलेल्या त्यांच्यात आपापसात भांडण झाले. अतिक सय्यद वरती इतर मित्रांनी हल्ला केला, यात तो जखमी झाला. गंभीर जखमी झालेल्या अतिक सय्यदचा मृत्यू झाला. भोसरी पोलिसांनी तीन संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे.



