पुणे : बिबळेवाडीत शाळेतील बाऊन्सर्सकडून पालकांना धक्काबुक्की झाल्याचं प्रकऱण ताजं असतानाच आता उंड्री भागातील शाळेतही असाच प्रकार घडल्याचं समोर आलं आहे. युरो शाळेत गेलेल्या पालकांना प्रवेश शुल्काच्या मुद्द्यावरुन अडवणूक करण्यात आली. पालकांनी यावेळी आमच्या मुलांना शाळेत प्रवेश का दिला जात नाही असा जाब प्रशासनाला विचारण्याचा प्रयत्न केला. घटनेचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.
काही दिवसांपूर्वी बिबळेवाडीत क्लाइन मेमोरियल शाळेत पालकांना धक्काबुक्की झाली होती. त्यानंतर अधिवेशनातही हा मुद्दा गाजला होता. यानंतर शिक्षणमंत्र्यांनी शाळेत बाऊन्सर्स न ठेवण्याचे आदेश दिले होते. पण त्या आदेशाला केराची टोपली दाखवण्यात आल्याचं दिसत आहे.



