पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका प्राथमिक शाळेच्या 12 वर्गखोल्या डिजिटल करण्यात येणार आहेत. ‘आमदार स्थानिक विकास कार्यक्रमा’ अंतर्गत राबविण्यात येणा या प्रकल्पासाठी आवश्यक साहित्य खरेदी करण्याकरिता 31 लाख रुपये खर्च होणार आहे.
पिंपरी -चिंचवड महापालिकेच्या शहरात 123 शाळा आहेत. त्यांमध्ये 105 प्राथमिक आणि 18 माध्यमिक शाळा आहेत. प्राथमिक शाळांमध्ये 87 मराठी माध्यमाच्या, 14 उर्दू, तर हिंदी आणि इंग्रजी वर्गखोल्यांची संख्या एक हजार 121 आहे. या प्राथमिक शाळांमध्ये मुले 21 हजार 204, तर मुली 19 हजार 574 अशी एकूण 40 हजार 778 विद्यार्थिसंख्या आहे. आमदार स्थानिक विकास कार्यक्रमाअंतर्गत प्राथमिक शाळेच्या 12 वर्गखोल्या डिजिटल करण्यात येणार आहेत. त्यासाठी आवश्यक साहित्य खरेदी करण्यासाठी इच्छुक ठेकेदारांकडून निविदा मागविण्यात आल्या.
त्यामध्ये भोसरी येथील ‘इंदू इन्फोटेक सोल्युशन’ यांनी प्रतिवर्गखोली दोन लाख 58 हजार रुपये असा एकूण 31 लाख चार हजार रुपये लघुत्तम दर सादर केला. अंदाजपत्रकीय दरापेक्षा हा दर 5.55 टक्क्यांनी कमी असल्याने ही निविदा स्वीकृत करण्यात आली. त्यानुसार प्राथमिक शाळेच्या 12 वर्गखोल्या डिजिटल करण्यासाठी ‘इंदू इन्फोटेक’ यांच्यासमवेत करारनामा करण्यात येणार आहे.



