मुंबई : महापालिका निवडणुकीबाबतची सुनावणी सुप्रीम कोर्टानं पुढे ढकलली असून ती आता ३ मे रोजी होणार आहे. ओबीसी आरक्षण निर्णयाकडे राज्यातील नागरिकांचे लक्ष लागले होते आज 25 एप्रिल रोजी झालेल्या सुनावणीत कोर्टाकडून याचिका फेटाळली जाऊन निवडणूक प्रक्रिया सुरू होईल अशी आशा इच्छूक उमेदवारांची होती. त्यासाठी ते आजच्या सुनावणीकडे डोळे लावून बसले होते. मात्र आज दुसऱ्यांदा तारीख पुढे ढकलली गेली आहे.
आज पुन्हा एकदा ओबीसी आरक्षण याचिकेवर निकाल देण्याऐवजी पुढची तारीख दिल्यामुळे त्यांची निराशा झाली आहे. त्यामुळं पावसाळापूर्वी महापालिकेची निवडणुकांची स्थिती सध्या जैसे थेच असणार आहे. ओबीसी आरक्षणाचा तिढा निर्माण झाल्यानं राज्यातील महापालिका निवडणुका सध्या लांबवणीवर पडल्या आहेत. मुदत संपलेल्या महापालिकांवर सध्या प्रशासक नेमण्यात आले आहेत. आज यासंदर्भात सुप्रीम कोर्टात सुनावणी होती. पण आजची सुनावणीही पुढे ढकलल्यानं इच्छुकांची निराशा झाली आहे.



