पिंपरी : पुणे येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या निवासस्थानी भोसरी विधानसभेचे प्रथम आमदार विलास लांडे, पिंपरी चिंचवडचे माजी महापौर जेष्ठ नेते आझम पानसरे व राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी भेट घेतली. ११ मे तारखेला ईद ए मिलाद कार्यक्रमासाठी साहेबांनी उपस्थित राहावे अशी विनंती केली. साहेबांनी उपस्थित राहण्यास वेळ दिला.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माजी शहराध्यक्ष माजी महापौर संजोग वाघेरे पाटील, नगरसेवक मयूर कलाटे, मोरेश्वर भोंडवे, माजी नगरसेवक विनायक रहस्यभेद, दीपक साकोरे, राम गावडे, मज्जिद के मौलाना आदी मान्यवर उपस्थित होते.



