चिंचवड : चिंचवड येथील गावडे पार्क, एम्पायर ईस्टेट प्रभागातील नगरसेवक राहणाऱ्या माजी नगरसेविका जयश्री गावडे व त्यांचे पती वसंत गावडे यांच्यावर चिंचवडगावात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घरगुती प्रॉपर्टीच्या कारणावरून हा गुन्हा नोंद घेत असल्याची माहिती समोर आली आहे.
सविस्तर वृत्त थोड्याच वेळात
प्रथम खबर हकीकत : मी अशिष मोरेार गावडे, वय-32 वर्षे, धंदा व्यवसाय रा. सुरभी बंगालो गावडे कलनी गावडेनगर
फिर्यादी जबाब दिनांक 01/06/2022 पार्क, चिंचवड पुणे. मो.नं. 9850347331. समक्ष चिंचवड पोलीस ठाणे येथे हजर असताना जबाब देतो की, मी वरील ठिकाणी कुटुंबासह
राहणेस असुन मौ प्रपर्टी खरेदी विक्रीचा व्यवसाय करतो. आज रोजी चिंचवड पोलीसांनी बोलावले असता मला आम्ही दिलेला तक्रारी अर्ज दाखविला असता तो आम्हीच केला असुन त्याबाबत माझे सांगणे की, सध्या आम्ही राहत असलेले सव्हे नं. 188/1 पार्ट सीटीएसनं. 4134/7/3 क्षेत्रफळ (469.71 चौ. मि. सी. टी. एस. प्रमाणे) या मिळकतीवरील बांधलेला सुरभी बंगला हा माझे आजोबा नामे :- धोंडीबा गणपत् गावडे यांनी पाच वर्षांपूर्वी त्यांचा मृत्यु होण्या आगोदर वरील बंगला हा माझ्या आईचे नावावर अर्धा व माझे चुलते यसंत धोंडीबा गावडे वय अंदाजे 55 यांच्या नावा वरती अर्धा केला होता. माझे वडील नामे:- मोरेार धांडीबा गावडे हे गेली 25 वर्षा पुर्वी मयत झाल्याने वरील बंगला हा माझे आजोबा नामे:- घांडीबा गणपत गावडे यांनी माझ्या आईचे व चुलत्याचे नावावर अर्धा अर्धा केला होता. त्यानंतर माझे चुलते वसंत धोडीबा गावडे यांनी सदरचा बंगल्यावरती द कराड अर्बन को ऑप बक लिमीटेड कराड या बकेकडून 70,00000/- ( सत्तर लाख) रुपये कर्ज घेवुन त्या कर्जाच्या तारणकामी वरील बंगला बकेला तारण म्हणुन दिला होता त्याने कर्ज घेताना आम्हाला वासात घेतले नाही किंवा सदर बंगला तारण ठेवून कर्ज घेत आहे या बाबत कसलीही माहीती दिली नाही. सदर बंगल्या वरती घेतलेले कर्ज माझ्या चुलत्याने वेळेवर न फेडल्याने बँकेचे अधिकारी कर्ज वसुलीसाठी वारंवार आमच्या घरी युवु लागल्याने आम्ही त्यांच्या शाब्दीक जाचाला कंटाळुन आम्ही सर्वजन आमचे जुने घर गावाडे चंबर्स मध्ये गावडे पार्क या ठिकाणी राहण्यास गेलो. त्यावेळी आम्ही माझे चुलते यांना कर्जा बाबत विचारले असता त्यानी कर्जाबाबत उडवा उडवीची उत्तरे देत असत त्यानंतर बँकेचे अधिकारी वारंवार घरी येवु लागल्याने माझे चुलते बँकेच्या अधिकायांच्या कर्ज वसुलीला कंटाळून त्यांच्या स्वत:चा प्राधिकरण निगडीतील मदनलाल धिंग्रा मैदाना शेजारी असलेल्या कायरा नावाच्या बंगल्यात रहाण्यास गेले. वरिल सुरभी बंगला हा माझे आजोबा धोडिबा गणपत गावडे यांनी बांधल्याने व तो माझे चुलते यांनी त्यांचे नावे कुलमुत्यारपत्रा अधारे सर्व प्रपर्टी माझे वसंत घोंडीबा गावडे यानी त्यांचे नावावर करुन घेतले होते. त्यांचेकडे कुलमुत्यारपत्र असल्याने त्यांनी द कराड़ बकेकडुन कर्ज घेतले होते. बकेकडे तारण असलेले सदरचा बंगला आमची वडीलोपार्जीत प्रोपर्टी असल्याने आम्ही घरातील सर्वजन व नातेवाईक असे एकत्र बसुन सदर बंगला आपण कर्ज भरुन सोडवुन घेवु असा विचार विनीमीय चालु असताना सदर बँकेने आमचा वरील बंगला कर्ज फेडुन परत ताब्यात घ्या असे नोटीस दिली व कर्ज नाही फेडले तर सदर बंगल्याचा शासनाच्या नियमाप्रमाणे लिलाव करुन सदर कर्जाची संपुर्ण रक्कम वसुल केली जाईल असे आम्हास कळविल्याने आम्ही सदर कर्ज फेडणे बाबत व कर्ज नाही फेडले तर बंगल्याचा लिलाव केला जाईल या बाबत माझे चुलते नामे वसंत धोंडीबा गावडे यांना सांगितले तेव्हा त्याने आम्हाला सांगितले की सदरच्या बंगल्या वरती असलेले कर्ज व त्याचे व्याज हे बंगल्याच्या किंमतीपेक्षा जास्त झाले आहे मी ते भरणार नाही किंवा तुम्हाला कर्जफेडण्यासाठी मदतही करणार नाही. बंगल्याचे जे काही शासनाच्या नियमाप्रमाणे होईल ते होऊ दया असे त्यांनी सांगितल्याने आम्ही घराचे सर्व एकत्र बसुन सदर बंगल्यावरीत असलेल्या कर्जा बाबत विचार विनिमय करून मी स्वतः सदर बँके मध्ये जावुन आमच्या बंगल्यावरती असलेल्या कर्जा बाबत संपुर्ण माहीती घेऊन बँक अधिकायांकडे चौकशी केली असता त्यांनी सांगितले की तुमच्या बंगल्याची शासनाच्य नियमाप्रमाणे लिलाव करण्याचा आदेश निघाला असुन आपणास सदरचा बंगला लिलावामध्ये शासनाच्या नियमाप्रमाणे त्याची जी किंमत होईल ती आपण भरावी व सरदचा बंगला आपल्या नावावर करून घ्यावा अशी बँकेकडुन माहीती मिळाल्यानंतर सदरचा बंगला हा आमचा वडीलोपार्जीत व माझ्या आजोबांनी बांधल्यामुळे सदरचा बंगला हा दुसयाने कोणी घेतल्यास त्याबाबत आमच्या आस्मितेचा प्रश्न आमच्या पुढे निर्माण झाल्याने आम्ही सदरचा बंगला बँकेकडून लिलावामध्ये विकत घेण्याचे ठरवले त्या प्रमाणे आम्ही बँके मध्ये जावुन सदर बाबत माहीती देवुन बँकेने ज्या दिवसी सदर बंगल्याचा लिलाव केला त्या दिवशी आम्ही सर्वजण त्या बंगल्याच्या अस्मिते पोटी शासनाच्या नियमाप्रमाणे लिलावामध्ये त्याची किंमत 2,61,00000/- (दोन कोटी एक्सप्ष्ट लाख) रुपये इतकी झाली ती मी व माझी आई व भाऊ अमित असे शासनाच्या नियमाप्रमाणे बँकेमध्ये भरली आहे. त्यानंतर सदर बँकेने वरील प्रपर्टी आमचे नावे करून सदर प्रपर्टीचा कब्जा दिला. त्यानंतर त्यामध्ये माझा चुलते नामे: वसंत धांडीबा गावडे यांचा कसल्याही प्रकारचा काहीही संबंध नाही सदरची प्रपर्टी बंगला माझ्या आईचे व आम्हा दोन भावाचे नावावर दि. 18/09/2020 मध्ये झाल्याने आम्ही सर्व सदर ठिकाणी रहाण्यास आलो आहोत सदर बाबत माझे चुलते वसंत गावडे व चुलती नामे जयश्री वसंत गावडे वय 48 रा. कायरा बंगला प्राधिकरण निगडी यांना वरील सर्व प्रकार समजल्याने ते दि. 20/09/2020 रोजी सकाळी 10/00 वा सुमारास पती पत्नी अचानकपणे कसल्याही प्रकारची आम्हास माहीती न देता आमच्या घरामध्ये घुसुन माझ्या आईस म्हणाले की, तुझ्याकडे लय पैसा झाला आहे का माझ्या बापाचा बंगला तो एकटीच्या नावे करून घेतला आहे याचा वाईट परिणाम तुला भोगावा लागेल, असे बोलून धमकी देत असताना माझी चुलती जयश्री गावडे त्याच्या पाठोपाठ घरामध्ये घुसली घरात प्रवेश करताच तिने शिवीगाळ सूरू केली मी तिला माझ्या आईने मोठयाच्या नात्याने समजवण्याचा प्रयत्न केला परंतु ती शिव्या देवून रागाच्या भरामध्ये माझ्या आईचे अंगावर धावुन आली व धक्का बुक्की करून मोठमोठयाने आरडा ओरडा करुन सांगु लागली की, सदरचा बंगला माझ्या सासयाने बांधला आहे. मी इथेच राहणार माझा नवरा मुले ही इथेच राहणार तेव्हा माझी आई त्या दोघांनाही समजावुन सांगण्याचा प्रयत्न केला की सदरचा बंगला मी बँके कडुन शासनाच्या नियमाप्रमाणे लिलावामध्ये विकत घेतला असुन तो आमचे नावे बकेने शासनाच्या नियमा प्रमाणे करुन त्याचा ताबा मला दिला आहे. तेव्हा त्या दोघांही सांगितले की आम्ही इथेच रहाणार सदरची प्रपर्टी ही माझ्या वडीलांची आहे तुम्हाला काय करायचे ते करा आम्ही बंगल्याच्या बाहेर जाणार नाही असे म्हणुन त्यांनी आमचे बंगल्यामध्ये बळजबरीने धमकी देवुन माझा भाऊ अमित यास रोहित वसंत गावडे यांनी मारहाण केली आहे. माझी चुलती नामे:- जयश्री गावडे ही माजी नगरसेवक असुन ती आमचेवर खोटे गुन्हे दाखल करेल म्हणुन आम्ही तिचेशी घाबरुन काहीएक बोललो नाही. किंवा पोलीस ठाणे येथे सुध्दा यापुर्वी तक्रार देण्याकामी आलो नाहीं. तरी त्यांनी आम्ही खरेदी केलेले मिळकतीमध्ये संगणमताने अनाधिकृत प्रवेश करून उत्तर दिशेकडील अध्या बंगल्याचा ताबा घेतला आहे. म्हणुन माझी वसंत धोंडीबा गावडे, व सौ. जयश्री वसंत गावडे रा:- सुरभी बंगलो गावडे कलनी, गावडे पार्क, चिंचवड, पुणे. यांचेविरुध्द तक्रार आहे. वरील जबाब मी सांगितल्या प्रमाणे मराठी मध्ये संगणकावर टंकलिखीत केला असुन तो मी याचुन पाहिला असता तो माझ्या सांगण्याप्रमाणे खरा व बरोबर आहे. हा जबाब दिला.




