चाकण : खरेदी केलेल्या शेतजमीनीची सातबारा नोंद करण्यासाठी लाच स्वीकारताना तलाठ्या लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने खेड येथे अटक केली.
याबाबत सविस्तर माहीती अशी – खेड येथील एका ज्येष्ठ नागरिकांला खरेदी केलेल्या शेतजमीनीची सातबारा नोंद करायची होती. मात्र या नोंदीसाठी टोकावडेचे तलाठी सुजित सुधारक अमोलिक (वय ५०) पाच हजार रुपयांची लाच मागितली होती. या प्रकरणी ज्येष्ठ नागरिकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. अखेर तडजोडीअंती संबंधित तलाठी चार हजार रुपयांवर तयार झाला. त्याचवेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अमोलिक याला चार हजार रुपयांची लाच स्विकारताना रंगेहात पकडले.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस निरिक्षक ज्योती पाटील पुढील तपास करीत आहेत. पोलीस अधिक्षक राजेश बनसोडे, अपर पोलीस अधिक्षक सुरज गुरव यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली.




