पिंपरी : राज्यात राज्यसभेच्या निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले असताना दोन्ही बाजूंनी एकेक मतासाठी गोळाबेरीज करण्यात येत आहे. चिंचवडचे भाजप आमदार लक्ष्मण जगताप प्रदीर्घ उपचारानंतर घरी विश्रांती घेत आहेत. अशावेळी ते मतदानासाठी जातील का? याबाबत चर्चा सुरू होती मात्र त्यांना खास एअर लीप्ट रुग्णवाहिकेतून मतदानासाठी मुंबई येथे नेण्यात आले आहे त्यांनी आज सकाळी मुंबईसाठी रवाना करण्यात आले.
महाराष्ट्रात राज्यसभेबरोबर विधान परिषदेच्या निवडणुकीचे वारे वेगाने वाहत असून एका एका मतासाठी भाजप व महाविकास आघाडी यांच्यात चुरस सुरू आहे. आमदार लक्ष्मण जगताप यांना गेली दीड महिना बाणेर येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. त्यांची प्रकृती ठीक झाल्यानंतर त्यांना आराम करण्यासाठी नुकतेच घरी सोडण्यात आले आहे. आमदार लक्ष्मण जगताप मतदान करण्यासाठी मुंबईला प्रकृती पूर्णपणे बरी नसतानाही पक्षाला आपल्या एका मताची गरज लक्षात घेऊन मुंबईला रवाना झाले आहेत.
दुसरीकडे राज्यसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मंत्री नवाब मलिक व माजी मंत्री अनिल देशमुख यांना मतदानाचा हक्क बजावता येणार नाही. राज्यसभेच्या १० जून रोजी होणाऱ्या निवडणुकीत मतदान करण्यासाठी अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांचा एक दिवसाचा जामीन अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. विशेष न्यायालयाने आज (गुरुवार) या संदर्भात निर्णय देत मतदानासाठी जामीन देण्यास नकार दिला आहे. त्यानंतर वरील न्यायालयात महाविकास आघाडी सरकारचने याचिका दाखल केली आहे. यावर तातडीची सुनावणी होणार आहे. एकेक मतासाठी दोन्ही बाजूंनी प्रयत्न केला जात आहे.


