तळेगाव – तळेगाव दाभाडे नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुक २०२२ साठी प्रभागनिहाय आरक्षण सोडत काढून सोमवारी (ता. १३) जाहीर करण्यात आले. श्रीमंत सरसेनापती अजितसिंहराजे दाभाडे (सरकार) व्यापारी संकुलात सकाळी अकरा वाजता उपजिल्हाधिकारी अजय पवार, तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे मुख्यधिकारी विजयकुमार सरनाईक, उपमुख्याधिकारी सुप्रिया शिंदे यांच्या उपस्थितीत अनुसूचित जाती महीला आणि सर्वसाधारण महीलांच्या आरक्षण निश्चितीकरता सोडतीचे आयोजन करण्यात आले होते.
नगरपरिषदेच्या वीर जिजामाता प्राथमिक शाळा क्रमांक-५ मधील इयत्ता चौथीच्या विद्यार्थीनी रजनी जितेंद्र बासूदकर आणि श्वेता अजय कांबळे यांच्या हस्ते चिट्ठया काढून आरक्षण सोडत काढण्यात आली. प्रभाग क्रमांक १० आणि ०३ साठी चिठ्ठया टाकून सोडत काढण्यात आली. त्यानुसार प्रभाग क्रमांक १० अ अनुसूचित जाती सर्वसाधारण तर प्रभाग क्रमांक ३ अ अनुसूचित जाती महिलांसाठी आरक्षित झाला आहे.२८ जागांसाठी १४
प्रभागांचे गटनिहाय आरक्षण पुढीलप्रमाणे –
प्रभाग क्रमांक ०१ : अ : सर्वसाधारण महीला, ब : सर्वसाधारण,
प्रभाग क्रमांक ०२ : अ : सर्वसाधारण महीला, ब : सर्वसाधारण,
प्रभाग क्रमांक ०३ : अ : अनुसूचित जाती महीला, ब : सर्वसाधारण,
प्रभाग क्रमांक ०४ : अ : अनुसूचित जमाती महीला, ब : सर्वसाधारण,
प्रभाग क्रमांक ०५ : अ : सर्वसाधारण महीला, ब : सर्वसाधारण,
प्रभाग क्रमांक ०६ : अ : सर्वसाधारण महीला, ब : सर्वसाधारण,
प्रभाग क्रमांक ०७ : अ : सर्वसाधारण महीला, ब : सर्वसाधारण,
प्रभाग क्रमांक ०८ : अ : सर्वसाधारण महीला, ब : सर्वसाधारण,
प्रभाग क्रमांक ०९ : अ : सर्वसाधारण महीला, ब : सर्वसाधारण,
प्रभाग क्रमांक १० : अ : अनुसूचित जाती, ब : सर्वसाधारण महीला, प्रभाग क्रमांक
११ : अ : सर्वसाधारण महीला, ब : सर्वसाधारण,
प्रभाग क्रमांक १२ : अ : सर्वसाधारण महीला, ब : सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक
१३ : अ : सर्वसाधारण महीला, ब : सर्वसाधारण,
प्रभाग क्रमांक १४ : अ : सर्वसाधारण महीला, ब : सर्वसाधारण,
१४ प्रभागातील, एकुण २८ पैकी १३ जागा सर्वसाधारण आहेत.
एक जागा अनुसूचित जमाती महीला, १ जागा अनुसूचित जाती महीला तर एक जागा अनुसूचित जमाती सर्वसाधारणसाठी आरक्षित आहे. उर्वरित १२ जागा सर्वसाधारण महिलांसाठी आहेत. गेल्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आरक्षणाच्या तुलनेत यावेळी खुप मोठा काही बदल न झाल्याने उपस्थित सर्व इच्छुकांमध्ये आलबेल जाणवली.




