वडगाव मावळ :- तळेगाव दाभाडे येथील स्वराज नगरी जवळील एका रो हाऊस मधील फ्लॉवर पॉट व पार्किंग मधील गाडीच्या टायरखाली घोणस जातीच्या सापांची सुमारे २३ लहान पिल्ले व घोणस जातीची माधी शुक्रवारी (दि.१७) मिळून आली आहेत.
शुक्रवारी (दि.१७) सकाळी सात वाजल्याच्या सुमारास तळेगांव दाभाडे येथील स्वराज नगरी जवळील रमेश भालेकर यांच्या रो हाऊस मधील फ्लॉवर पॉट व पार्किंग मधील गाडीच्या टायर खाली सापाची पिल्ले आघळून आली.तेव्हा त्यांनी तातडीने वन्यजीव रक्षक झाकीर शेख व जिगर सोळंकी यांना माहिती दिल्यावर त्यांनी तातडीने भालेकर यांच्या घरी पोहचून वन्यजीव रक्षक समितीचे संस्थपक अध्यक्ष निलेश गराडे यांना बोलावून तेथील सर्व घोणस जातीच्या सापांची पिल्ले व मादी यांना पकडुन तळेगांव दाभाडे येथील जंगलात सुरक्षित सोडले आहे.




