भोसरी : भोसरी येथे एका तरुणाचा निर्घुणपणे खून करण्यात आला. या घटनेत मानेवर, डोक्यावर धारदार शस्त्राने वार करून ही हत्या करण्यात आली. यानंतर पोलिसांनी याप्रकरणी दोघांना अटक केली आहे.
दीपक वाघमारे (वय २९ वर्षे, रा. गवळीनगर) असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. पोलिसांनी या घटनेचा तपास करीत हल्ला करणाऱ्या सुनील जावळे (वय २३ वर्षे, रा. भोसरी) आणि रोहित सोनवणे (वय १८ वर्षे, रा. भोसरी) या तरुणांना ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी दीपक वाघमारे यांच्या वडिलांनी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दीपकला अज्ञात इसमांनी अज्ञात कारणासाठी दगडाने तसेच धारदार हत्याराचा वापर करून गळ्यावर, मानेवर व डोक्यात मारून गंभीर जखमी करून जीवे ठार मारले. ही घटना १७ ते १८ जून च्या दरम्यान घडली. याप्रकरणी आरोपींविरोधात भोसरी पोलिस ठाण्यात भा. द. वि. कलम ३०२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.




