वाकड : “विक्रमभाऊ वाघमारे युवा मंच” आयोजित “अंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त” राबवण्यात आले. या शिबिरास परिसरातील नागरिकांनी उस्पुर्त प्रतिसाद देत उपस्थिती दर्शवली. या शिबीरास वयोवृध तसेच तरुणांने देखिल सहभाग घेतला.त्याच प्रमाणे या शिबीरात सहभागी घेतलेल्या प्रत्येक व्यक्तीस ई-प्रमाणपत्र देण्यात आले.

तसेच या शिबीराचे अवचित्य साधुन प्रभाग क्र. ३८ मधील सफाई कर्मचा-यांना युवा नेते विक्रम वाघमारे आणि माजी नगरसेविका अश्विनी वाघमारे यांच्यातर्फे छत्री व रेनकोटचे वाटप करण्यात आले. सर्व समवेत अल्पउपहाराचा आनंद घेत कार्यक्रमाची संगता करण्यात आली.




