कामशेत (वार्ताहार) ; गेल्या काही दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने पावना नगर रोड व दौडे कॉलनी या हद्दीत ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत खड्ड्यात पाणी साचल्याने वाहनचालकाच्या खड्ड्यांचा अंदाज येत नाही समोरील वाहनांचा वेग अचानक कमी झाल्याने मागुण येणाऱ्या चालकाची वाहनावर चे नियंत्रण सुटते अचानक ब्रेक मारल्याने अपघात होतात यातून मोठा अपघात होण्याची शक्यता आहे
कामशेत पवनानगर दरम्यान या रस्त्याची पुन्हा दुरवस्था मोठ्या प्रमाणात झाली आहे. कामशेत- पवना नगर या रस्त्याचे काही महिन्यापुर्वी डांबरीकरण करण्यात आले होते. विविध ठिकठिकाणी तसेच ठिकठिकाणी रस्त्याच्या मध्य भागी खड्डे पडून दुरावस्था झाली आहे.
तसेच दौडे कॉलनी फट्या जवळ मोठ्या प्रमाणात रस्त्यावर खड्डे होऊन पाणी साचलेले दिसून येते त्याठिकाणी रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते असे आढळून येते या खड्ड्यांचा त्या ठिकाणी नागरिकांना मोठ्या प्रमाणात गाडी चालवणे त्रास होत आहे. संबधित रस्त्याचे काम करणाऱ्या ठेदेदाराने रस्त्याच्या कामाचा दर्जा राखला नसल्याचे यावरून स्पष्ट झाले. दिसून येत आहे. . मात्र, ठेकेदाराने काम निकृष्ट दर्जाचे केल्याने रस्त्याची विविध ठिकाणी मोठे खड्डे पडून दूरवष्टा होण्यास सुरुवात झाली आहे. अपघाताचे प्रमाण ही वाढत आहे. . जास्त पाऊस पडल्याने रस्ता वाहून जाऊ शकतो. असे चित्र पहावयास दिसत आहे.
नागरिकांना रस्त्याच्या कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. पवन मावळ करूज कडदे बेडसे येवले वाडी चिखालसे। दौडे कॉलनी मावळातील याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे अशी मागणी येथील नागरिक करत आहे. या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या अनेक दुचाकी व् चार चाकी चालकांना त्रास होत आहे. या रस्त्यावर मोट मोठे खड़े पडल्याने दुचाकी चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे
अनेकदा या रस्त्यावर दुचाकी चालक कमी गती व् खड्डा यामुळे पडत आहे. मागुन येणाऱ्या वाहनाचा त्यांना धक्का लागुन अपघात होत आहे. हा रस्ता ख़राब असल्याने पवना नगर।चौक ब्रिज जवळ मोठी वाहतूक कोंडी होत आहे. रस्त्यावरचे खड्डे बुजवावे अशी मागणी तेथील ग्रामस्थ नागरिक करीत आहे.




