पिंपरी : मिलिंद डान्स अकादमी व कलार्पण डान्स अकादमी यांच्या संयुक्त विदयामानाने आचार्य अत्रे रंगमंदिर येथे गुरू अभिवादन सोहळा आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रमुख पाहुणे डॉ. प्रशांत खाडे व सौ. परदेशी यांनी दिपप्रज्वलन करुन कार्यक्रमास सुरुवात केली.
मिलिंद डान्स अकादमीच्या द्वितीय वर्षाच्या विदयार्थिनी सौ समीरा मोरे, प्रिती तराळे, मोनाली वासू मानसी पाटील, वर्षा जाडकर संध्याराणी काळे यांनी गणेश वंदना सादर केली. त्यानंतर संचालक मिलिंद रणपिसे यांनी तीन तालामध्ये बनारस घराण्याच्या पारंपारिक बंदिशी सादर केल्या. तालाची सांगता पं बिंदादीन महाराजांच्या प्रगटे ब्रिज नंदलाल या भजनाने करुन रसीकांची वाहवा मिळवली. त्यांनतर लखनऊ घराण्याचे नर्तक अनिकेत ओव्हाळ यांनी लखनऊ घरण्याच्या पारंपारीक बंदिशी द्रुत तीन तालामध्ये सादर करुन रसीकांच्या टाळ्या मिळवल्या.
यानंतर सौ पुनम सोरटे यांनी सब बन ठन आयी शाम प्यारी रे ही पं बिंदादीन महाराजांची प्रसिदध ठुमरी सादर केली. तसेच मिलिंद डान्स अकादमीच्या अन्वी तराळे, वेदा राजहंस, सृष्टी काळे, गायत्री दयानंदन, ईशा हेजमडी . आर्या असलकर यांनी कथक फयुजन सादर केले अप्रतिम पदलालित्य व जोरदार चकरा यांना रसीकांचा भरभरुन प्रतिसाद मिळाला. तसेच कलार्पण डान्स अकादमीच्या विदयार्थीनी मनस्वी राठोड, अन्वी चोपडे, स्वरा घारे, माऊली बाहेकर ओवी गावडे सौख्या घुगे यांनी प्रथम वर्षातील तीनताल व हस्तके सादर केली. त्यानंतर सुफीया शेख, आदिती सोरटे, मुक्ता देशपांडे, नंदिनी दिघे, भैरवी सरोदे सृष्टी नाईक व पुनम सोरटे यांनी शिवस्तवन भैरवी रागातील तराणा व गतनिकास सादर करुन रसीकांची वाहवा मिळवली.
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात प्रशांत पवार यांनी अभंगवाणी सादर केली त्यांनी गायलेल्या बाजे रे मुरलीया बाजे या भजनाला रसीकांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रमाच्या शेवटी यश त्रिशरण व पवन झोडगे यांनी तबला पखवाज जुगलबंदी सादर करुन रसीकांची मने जिंकली. कार्यक्रमाला साथ संगत श्री संतोष साळवे हरिभाऊ आसतकर पवन झोडगे, यश त्रिशरण विश्वजीत लोंढे यांनी केले. कार्यक्रमाचे निवेदन मानस साठे यांनी केले.




